Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील ! दुकाने, हॉटेल अन् मॉल बाबतचे निर्बंध शिथिल, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Unlock | गेल्या 3 महिन्यापासून पुणे शहर निर्बंधाच्या कचाटयात अडकले आहे. निर्बंधातून कधी एकदा मुक्तता मिळेल असं पुणेकरांना (Pune Unlock) झालं आहे. राज्य सरकारनं ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे तिथं निर्बंध शिथिल केलेले आहेत. पुण्यातील निर्बंध देखील शिथिल करावेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांच्याशी चर्चा केली. आज पुण्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू आहे. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol ) यांनी पुण्याचे निर्बंध शिथिल केलं असल्याचं सविस्तर ट्विट केलं आहेत. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol ) यांनी केलेल्या ट्विटप्रमाणे पुण्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी राहणार आहे. मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार (लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश) आहेत.

पुणे शहरातील निर्बंध शिथिल (Pune Unlock) झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाणार आहे. दरम्यान, कोरोना परिस्थितीची आढावा बैठक सध्या सुरू आहे. त्या बैठकीस लोकप्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत. बैठकीनंतर अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलणार असल्याचं समजतंय. एकंदरीत पुण्यातील कोरोना निर्बंध हे शिथिल झाल्याचं महापौरांनी ट्विट करून सांगितलं आहे. पुण्याला एक न्याय आणि मुंबईला एक न्याय का असा सवाल देखील महापौरांनी उपस्थित केला होता. एवढेच नव्हे तर पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारला पत्र देखील लिहीलं होतं. आता पुण्यातील निर्बंध शिथिल झाले आहेत.

दरम्यान, पुण्यातील निर्बंध हे सोमवारपासून शिथिल करण्यात आल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

Web Title :- pune unlock | restrictions in pune relaxed restrictions on shops hotels and malls relaxed learn more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Taxpayers | टॅक्सपेयर्सला दिलासा ! इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तक्रार नोंदवण्यासाठी सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार, काय घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष

Pune Crime Branch Police | तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारा सराईत आरोपी गजाआड