घरकाम करणार्‍या मोलकरणीनं चोरले पावणे 3 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घर काम करणार्‍या मोलकरणीनेच कुटूंबिय रुग्णालयात गेल्यानंतर घरातील पावणे तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. बालेवाडीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी संकल्प जैन (वय 36, रा. बाणेर) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोलकरणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकल्प यांनी काही महिन्यांपुर्वी घरकामासाठी महिला ठेवली होती. 26 फेबु्रवारी ते 2 मार्च कालावधीत संकल्प पत्नीच्या आजारपणामुळे रुग्णालयात होते. त्यावेळी मोलकरणीने ताब्यातील चावीने कपाटातून सोन्याचे दागिने, डायमंड, घड्याळ मिळून 2 लाख 83 हजारांचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.