Pune : मौजमजेसाठी वाहन चोर्‍या करणार्‍याला येरवडा पोलिसांकडून अटक, 8 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मौजमजेसाठी वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्या अल्पवयीन साथीदारास पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रदीप राजू अडागळे (वय 27, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पकडले आहे.

शहरात घरफोडण्याच्या सत्रासोबतच सोन साखळी आणि वाहन चोरटे देखील काही दिवसांत सक्रिय झोले आहेत. यादरम्यान हद्दीत गस्त घालून या घटना रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी येरवडा पोलीस गुन्हेगारांची माहिती घेत होते. त्यावेळी गोल्फ चौकात दोघे संशयित उभे असून, त्याच्याकडे एक दुचाकी आहे. यानुसार पो .नि .शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी करपे, पो शि कारखेले, परदेशी, भोरडे, पडोळे, सकट, शिंदे, पवार व त्यांच्या पथकाने या दोघांना पकडले. यावेळी आरोपी प्रदीप याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्या दोघांकडून शहरातील एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोघेही मौजमजेसाठी दुचाकी चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.