Pune : फुटपाथवरील लोखंडी बारवर आढळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – फुटपाथवरील लोखंडी बारवर आढळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर 17 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. वानवडी येथील शिवरकर रस्त्यावर ही घटना घडली.

आशुतोष सुधीर यादव (वय २०,रा. नवीन मोदीखाना, लष्कर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पियुष बागीस झा (वय १७,रा. परमार पार्क, वानवडी) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार यादव व त्याचा मित्र झा रात्री दहाच्या सुमारास वानवडी येथील शिवरकर रस्त्याने निघाले होते. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने यादव याने दुसऱ्या दुचाकीला मागून धडक दिली. तसेच ते फुटपाथवरील लोखंडी बारवर आदळले गेले. यात दुचाकी चालक गौतम हिमानी (वय ४४,रा. वानवडी)जखमी झाले.

तर, यादव व झा हे यात गंभीर जखमी झाले होते. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यादव याचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कांबळे करत आहेत. याघटनेत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.