पंजाबमध्ये विषारी दारूचं प्राशन केल्यानंत 26 जणांचा मृत्यू, चौकशीसाठी SIT ची स्थापना

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था –   पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरनतारनमध्ये आतापर्यंत 26 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला आहे. पोलिसांनी विषारी दारू तयार करणार्‍या काही लोकांना अटक केली आहे. यासह तरसिक्क पोलिस ठाण्याचे एसएचओ यांना निलंबित केले आहे. या प्रकरणात एसआयटीची स्थापना केली गेली आहे, जी सर्व प्रकरणांची चौकशी करेल. पंजाबच्या 3 शहरांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यात अमृतसर आणि तरनतारनमध्ये 10-10 आणि बटालामध्ये 6 शहरांचा समावेश आहे. या प्रकरणाची माहिती देताना डीजीपी दिनकर गुप्ता म्हणाले की, पहिले पाच मृत्यू 29 जूनच्या रात्री अमृतसर ग्रामीण तरसिक्क पोलीस स्टेशनमधील मुच्छल व तंग्रा येथे झाले. 30 जुलै रोजी संध्याकाळी मुच्छलमध्ये आणखी दोन जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला, तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यानंतर मुच्छल गावात आणखी दोन मृत्यू तर बटाला शहरात दोन जणांचा मृत्यू झाला. आज पुन्हा बटाला येथे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यासह बटाला येथे विषारी दारू पिऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त तरनतारनमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले असून त्याचा तपास जालंधरच्या विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना सूट दिली आहे की, ते कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा तज्ञाच्या तपासणीत मदत घेऊ शकतात. जालंधरचे उपायुक्त यांच्यासह उत्पादन शुल्क व कर विभाग आयुक्त आणि तिन्ही जिल्ह्यांचे एसपीही या तपासणीत सहभागी होतील. सीएम अमरिंदर म्हणाले की, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

विषारी दारूच्या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. ही घटना लक्षात घेता मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यात कार्यरत असलेल्या कोणत्याही मद्यनिर्मिती यंत्रणेवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना शोध मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी बलविंदर कौरला अटक केली आहे. एसएसपी अमृतसर-ग्रामीण यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) चौकशी सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, जसविंदरसिंग, काश्मीरसिंग, कृपालसिंग आणि जसवंत सिंग या चार व्यक्तींचे आज पोस्टमोर्टम केले जाईल.