काय सांगता ! होय, कुत्र्याच्या नाकावर उगवलं ‘शेपूट’, ‘X-Ray’ पाहून डॉक्टर झाले ‘हैराण’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – अमेरिकेत मिसौरीमध्ये एक असा श्वानाचे पिलू (कुत्रा) आहे ज्याच्या नाकावर शेपूट उगवली आहे. मिसौरीच्या रस्त्यावर हा श्वास दिसला आणि एक बचाव पथकाने त्या कुत्र्याला उचलेले. एका बचाव पथकाकडून कुत्र्यांची मदत केली जाते. या पथकाने एका रस्त्यावरील कुत्र्याची मदत केली आणि या कुत्र्याला नरवाल असे नाव दिले.

हे कुत्र्याचे पिल्लू 10 महिन्याचे आहे. ज्या पथकाने या कुत्र्याची मदत केली त्या पथकाच्या संस्थापक रोशेल स्टीफन यांनी सांगितले की ही खरंच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. जे तुम्ही कधी पाहिले नसेल. ते म्हणाले की आम्ही या कुत्र्याला मदत करुन आनंदी आहोत.

एका रिपोर्टनुसार या संबंधित माहिती मिळताच लोक नरवाल नावाच्या या पिल्लाला पाहण्यास गेले. त्या कुत्र्याच्या पिल्लाबरोबर खेळले. लोकांना आणि मुलांना हे कुत्राचे पिल्लू पसंतीला उतरत आहे.

रोशेल यांनी सांगितले की या कुत्र्याच्या पिल्लाचा त्यांनी एक्स रे केला. या कुत्राला शेपटीचे हाड नाही जे पुढे या कुत्र्याला अडचणीचे ठरु शकते. या कुत्र्याचा एक्स-रे पाहून डॉक्टर देखील चकीत झाले. तर हे देखील स्पष्ट झाले की कुत्र्याच्या या दुसऱ्या शेपटीत कोणतीही हाड नाही.

 

Visit : Policenama.com