Radhakrishna Vikhe Patil | … त्यामुळे राज्यात चमत्कार होऊ शकतो – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe Patil | मागील काही दिवसापासून राज्यात राजकीय वादळ निर्माण झालं आहे. अनेक नेत्यांच्या बोलण्यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता भाजपचे (BJP) नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी एक सुचक विधान केलं आहे. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो, असं विखे पाटलांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते अहमदनगर (Ahmednagar) येथे एका महाविद्यालयातील विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलत होते.

त्यावेळी बोलताना विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोट बांधली आहे, त्याला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. सत्ता नसतानाही भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) 25-25 वर्षे एकत्र काम करत होती. त्यामुळे भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केले पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद येथे बोलताना भावी सहकारी असे वक्तव्य केले होते. त्यावेळी कार्यक्रमादरम्यान भाजप केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते. यापुर्वी भाजपकडून देखील अशी भाष्य होत होती. पंरतु, मुख्यमंत्री ठाकरेंनीच असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरुन राजकारणात चर्चांणा उधाण आलं आहे.

Web Titel :- miracles can happen maharashtra indicative statement radhakrishna vikhe patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शेतकर्‍याकडेच एक कोटी रूपयाची मागणी; मंगलदास बांदलला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

WhatsApp New Feature | ‘व्हॉट्सअ‍ॅप’नं आणलं नवं फिचर; एकच अकॉउंट 4 डिव्हाइसेसवर ओपन होणार

Pune Crime | प्रेमसंबंधांमधून जन्मलेल्या 13 दिवसांच्या बाळाची हत्या ! मुंढवा पोलिसांचं साडेतीन तास सर्च ऑपरेशन, महत्वाचे पुरावे हस्तगत