प्रसिद्ध रागिनी गायिकेच्या खुनप्रकारणी पोलिसांना मिळाले पुरावे, जवळच्याच व्यक्तीवरच ‘संशय’ बळावला

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रागिनी गायिका सुषमा खून प्रकरणात पोलिसांना ठोस पुरावे सापडले आहेत. पोलिसांना तिच्या जवळच्या लोकांवर संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक जवळच्यांची चौकशी केली आहे. लवकरच आरोपीला आम्ही अटक करू असा दावा पोलिसांनी केला आहे. कारण पोलिसांनी सर्व बाजूनी तपास करायला सुरुवात केली आहे.

मूळच्या जहांगीरपूरच्या नेकपूर येथील रहिवासी रागिनी गायिकेला मित्रा सोसायटीत 1 ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीस्वाराच्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले होते. घटनेदरम्यान आरोपींनी हेल्मेट घातले होते. यामध्ये सुषमाला चार गोळ्या लागल्या. यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी बुलंदशहर येथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

ADV

घटनेच्या दिवशी सुषमा स्थानिक पोलीस स्टेशमध्ये आधी झालेल्या हल्ल्याची माहिती करून घेण्यासाठी गेली होती. हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. पोलिसांनी ग्रामिण वाद, बुलंदशहर वाद आणि सुषमाचे संबंध लग्न आणि जमिनी संदर्भातील तपास पोलीस सध्या करत आहेत.

मित्रा सोसायटीत येऊन निर्भिडपणे वागणे आणि सुषमाचे अचूक ठिकाणी माहिती असणे यामुळे आरोपी सुषमाच्या जवळचा असू शकतो असा संशय पोलिसांना आहे.सुषमा भारतीय जनता पक्षात सामील होणार होती त्यामुळे तिचा खून करण्यात येऊ शकतो असाही पोलिसांना संशय आहे.

एसएसपी, गौतमबुद्ध नगर, वैभव कृष्ण ने सांगितले की अनेक वेगवेगळ्या बाजूने या केसाची तपासणी सुरु आहे. लवकरच आरोपीना पकडून याबाबतचा खुलासा केला जाईल. तसेच यामध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तीचा हात असू शकतो असा पोलिसांना दाट संशय आहे.

Visit : Policenama.com