टीम इंडियाच्या ‘या’ 20 वर्षीय बॉलरनं केला प्रेयसीसोबत ‘साखरपुडा’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –20 वर्षीय लेग स्पीनर राहुल चहर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. टीम इंडियाकडून आतापर्यंत टी 20 इंटरनॅशनल खेळलेल्या राहुलनं दीर्घकाळापासून त्याची गर्लफ्रेंड असलेल्या ईशानीसोबत साखरपुडा केला आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरनं इंस्टाग्रामवरून राहुल-ईशानीचे फोटो शेअर केले आहेत आणि राहुलच्या साखरपुड्याचं कन्फर्म केलं आहे. राहुल आणि दीपक हे चुलत भाऊ आहेत.

या साखरपुड्याला चहर ब्रदर्सची मॉडेल सिस्टर मालती चहर हिनंदेखील हजेरी लावली होती. मालतीनं साखरपुड्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यात राहुल आपल्या होणाऱ्या बायकोला अंगठी घालताना दिसत आहे.

राहुल चहरच्या साखरपुड्याचे विधी जयपूरच्या नाहरगढ फोर्टमध्ये पार पाडण्यात आले. राहुल आणि ईशानी यांची चार वर्षांची मैत्री लग्नात परावर्तीत होणार आहे. राहुल चहर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. आतापर्यंत त्यानं आयपीएलच्या 16 मॅचेस खेळल्या असून 15 विकेट घेतल्या आहेत. लिस्ट-ए-क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत त्यानं 35 सामन्यांमध्ये 60 विकेट घेतल्या आहेत.

View this post on Instagram

Twinning 🖤

A post shared by Rahul Chahar (@rdchahar1) on

View this post on Instagram

I Love blue and You 💙

A post shared by Rahul Chahar (@rdchahar1) on

 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like