राहुल गांधींचा भारतीय हवाई दलापेक्षा पाकिस्तानवर अधिक विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमनासंदर्भात भाजपवर केलेल्या टीकेला भाजपने उत्तर दिले आहे . राफेल मुद्द्यावर राहुल गांधी साफ खोटं बोलत आहेत . त्यांचा ना हवाई दलावर विश्वास , आहे ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे . अशी टीका केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे. राफेल संबंधात पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज आहे का असा जहीर सवाल राहुल गांधी यांनी म्हणले आहे.

राफेल करारावरील कागदपत्रे चोरीला गेली आहेत असा धक्कादायक दावा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायायलात केला आहे. आधी राफेल करारातील पैशाची चोरी झाली त्यानंतर कागदपत्र गायब झाली . त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे राहुल गांधी म्हणाले आहेत. या घाणाघाता नंतर राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.

राहुल गांधी यांचा भारतीय सुरक्षा व्यवस्थेपेक्षा पाकिस्तानवर अधिक विश्वास आहे. राहुल गांधी साफ खोटे बोलतात म्हणून त्यांच्या वक्तव्याचा मी निषेद करतो. त्यांचा ना भारताच्या हवाई दलावर विश्वास आहे ना सर्वोच्च न्यायालयावर त्यांचा विश्वास आहे असे रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत . राहुल गांधी यांना आता पाकिस्तानचे प्रमाणपत्र हवे आहे का ? असे असेल तर आम्ही त्यांना त्याबद्दल मदत करू शकत नाही असे रवीशंकर प्रसाद यांनी म्हणले आहे.

You might also like