परदेश दौऱ्यावरील टिकेला राहुल गांधी देणार का उत्तर ?, राज्यात आज 3 सभा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र, हरियाना येथील विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी हे अचानक गुपचुप परदेश दौऱ्यावर गेल्याने भाजपाने त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी आज प्रथमच महाराष्ट्रातील प्रचारात सहभागी होत आहे. त्यांच्या राज्यात तीन सभा होणार असून भाजपाच्या या टिकेला ते कसे उत्तर देतात. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यात त्यांचे पहिलेच भाषण होणार असल्याने ते नेमकी काय भूमिका मांडणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राहुल गांधी यांची पहिली सभा लातूरजवळील औसा येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास होईल. त्यानंतर ते मुंबईतील चांदिवली आणि धारावी भागात दोन सभा घेणार आहेत.

राहुल गांधीच्या परदेश दौऱ्यामुळे गांधी यांनी निवडणुकीतून पळ काढला. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच हार मानली अशी जोरदार टिका भाजपाने या प्रचारादरम्यान केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३७० कलम हा मुख्य मुद्दा बनविला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राहुल गांधी यांनी राफेलमधील भष्टाचार हा मुख्य मुद्दा उपस्थित करुन चौकीदार चोर है हा नारा दिला होता. पण, त्याला भाजपाने जोरदार प्रतिउत्तर दिले. तसेच बालाकोट एअरस्टाईक नंतर तर तो मुद्दा गैरलागू ठरला. आता राफेल भारतीय हवाईदलात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेत कोणता नवा मुद्दा उपस्थित करणार व आपल्या परदेश दौऱ्याबाबत काय सांगतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Visit : Policenama.com