चौकीदार चोरही नही डरपोक भी है ; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोदींनी देशाला फक्त फसव्या घोषणा देऊन दिशाभूल केले. शेतकरी आणि गरिबांना काहीही मिळाले नाही परंतु उद्योगपतींना कोट्यावधी रुपये देऊन त्यांचे कर्ज मोदी सरकाने माफ केले. मोदी भ्रष्टाचारावर समोरासमोर बोलायला घाबरतात म्हणून चौकीदार चोर ही नही डरपोक भी है असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. ते शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात करताच त्याच्या समोर उपस्थित जन समुदायातून चौकीदार चोर है अशा घोषणा सुरु झाल्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी देखील तीच घोषणा द्यायला सुरुवात केली. अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याबद्दल राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारवर टीका करण्यात सुरुवात केली. राफेल करारावर राहुल गांधी यांनी मोदींवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे.

या जाहीर सभेत मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण,  मिलिंद देवरा, संजय निरुपम, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड यांची भाषणे झाली. तसेच पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त आदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित होते.