‘जनाची नाहीतर मनाची तरी’ ! राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान प्रकरणी निर्णय दिला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी अडचणीत आले होते. परंतू सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीचा माफीनामा मंजूर केला. परंतू राहुल गांधी माफी मागावी यासाठी भाजपने आज देशव्यापी आंदोलन पुकारले. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींनी जनाची नाहीतर मनाची तरी लाज असेल तर देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ असे म्हणतं पंतप्रधान मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान रान उठवले होते. राफेल विमान कराराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर भाजपकडून आता मागणी करण्यात येत आहे की राहुल गांधींनी माफी मागावी. राहुल गांधींनी न्यायालयचा संदर्भ देऊन आरोपी केल्याने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर करावा लागला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा मागावा यासाठी देशभर आंदोलन देखील केले होते. मुंबईत भाजपच्या वसंत स्मृती येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. अशी मागणी करण्यात आली.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीवेळी पंतप्रधान मोदींच्या विरोधात टीकेची झोड उढवली होती. याच काळात मोदी सरकारला राफेल विमान खरेदी प्रकरणात ‘क्लीन चिट’ देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यादरम्यान राहुल गांधी यांना डेहराडूनमधील निकालाविषयी विचारले तेव्हा राहुल गांधी म्हणाले की आता सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे की चौकीदार चोर है.

न्यायालयाने न वापरलेले शब्द न्यायालयाने वापर असे सांगितल्याने गांधी यांच्यावर न्यायालीयन अवमानाची कारवाई करावी असा अर्ज भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दिला होता. न्यायालयाने याचा जाब विचारल्यावर सुरुवातीला राहुल गांधी यांनी कृतीचे समर्थन देणारे प्रतिज्ञापत्र केले, परंतू दुसऱ्यांदा सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांनी आपली चूक कबूल केली आणि बिनशर्त माफी मागितली. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. के. एम. जोसेफ, न्या. संजय कृष्ण कौल यांच्या खंडपीठाने राहुल गांधींना या प्रकरणी समज देऊन अवमानना कारवाई अटोपती घेतली होती.

Visit : Policenama.com