Rahul Narvekar | दिल्ली दौऱ्यात काय झाले, कुणाच्या भेटीगाठी घेतल्या? राहुल नार्वेकर यांनी दिली सविस्तर माहिती

नवी दिल्ली : Rahul Narvekar | शिवसेना आमदार अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि सत्ताधारी भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. विधानभवनात विधी विभाग तसेच वकिलांशी सल्लामसलत केल्यानंतर नार्वेकर हे यासाठीच दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जात आहे. आता त्यांनीच दिल्ली दौऱ्यात काय-काय घडले याबाबत माहिती दिली आहे.

राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांना माहिती दिली की, हा पूर्वनियोजित दौरा होता. यात अनेक भेटी-गाठी ठरल्या होत्या. त्यामध्ये काही भेटी या कायदेतज्ज्ञांसोबत होत्या. अपात्रतेसंदर्भातील कायद्यात परिस्थितीनुसार बदल होत असतात. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका आणि त्यामधील निर्देश, यात अजून काय संशोधन करण्याची गरज आहे किंवा याची अंमलबजावणी योग्यरित्या कशी करता येईल? याबाबत विविध तज्ज्ञांसोबत चर्चा केली. (Rahul Narvekar)

नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी, त्यापूर्वी आमदार अपात्रतेच्या संदर्भातील सुनावणी १४ तारखेला झाली होती. यानंतरची सुनावणी ठरलेली आहे. त्यानुसार ती घेतली जाईल. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अधिक बोलणे योग्य नाही. संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिले आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून काम करणे अपेक्षित आहे.

नार्वेकर म्हणाले, गरज पडल्यास दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना सुद्धा सुनावणीसाठी बोलावले जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

Bachchu Kadu On BJP | ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास…’, बच्चू कडूंचा भाजपला इशारा

Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

MLA Sunil Shelke On NCP Rohit Pawar | अजित पवारांच्या आधी रोहित पवारच भाजपमध्ये
जाण्यासाठी आग्रही होते; आमदार सुनील शेळकेंचा मोठा गौप्यस्फोट