ICU मधून बाहेर आला राहुल रॉय, तब्येतीत सुधारणा ! घेतोय स्पीच थेरपी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   1990 आलेल्या म्युझिकल ब्लॉकबस्टर सिनेमा आशिकी (1990 Blockbuster Movie Aashiqui) मधील बॉलिवूड अ‍ॅक्टर राहुल रॉय (Rahul Roy) ब्रेन स्ट्रोकनंतर मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. आज (बुधवार, दि. 2 डिसेंबर) त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. राहुल आता ICU मधून सामान्य रूममध्ये शिफ्ट झाला आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी राहुलच्या स्पीच आण फिजिकल थेरपीवर काम सुरू केलं आहे.

एका रिपोर्टनुसार राहुलच्या मेहुण्यानं सांगितलं की, आता राहुल धोक्यातून बाहेर आहे. कालच तो आयसीयूमधून नॉर्मल वार्डात शिफ्ट झाला आहे.

राहुल त्याचा आगामी सिनेमा एलएसी – द लिव बॅटल (L.A.C : The Live Battle) ची शूटिंग करताना कारगिलमध्ये त्याला ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर त्याला मुंबईत परत आणलं गेलं आणि नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर आशिकी या सिनेमानंतर त्यानं प्यार का साया, बारिश, जुनून, गजब तमाशा, दिलवाले कभी ना हारे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय फिर तेरी कहानी याद आई, सपने साजन के, नसीब असेही त्याचे काही सिनेमे सांगता येतील. त्यानं टीव्ही शोजदेखील केले आहेत. 2006 साली आलेल्या बिग बॉसच्या पहिल्या सीजनचा तो विनर आहे.