रेल्वेचं तिकीट कन्फर्म नसेल तर मिळेल विमान प्रवासाची ‘संधी’, ‘इथं’ मिळतेय ‘ऑफर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई असे नेहमी दिसून येते की, रेल्वे तिकिट कन्फर्म मिळण्याची वाट बघत असताना लोक वेटींगमध्ये तिकिट बुक करतात. परंतु, तिकिट वेटींग किंवा RAC राहून जाते. अशावेळी प्रवाशांना खुप अडचणींना तोंड द्यावे लागते.

परंतु, आता मुंबईतील एका स्टार्टअपने मोठ्या ऑफरची सुरूवात केली आहे. या अंतर्गत वेळेवर रेल्वे तिकिट कन्फर्म न झाल्यास स्टार्टअप त्याच किमतीत 24 तासाच्या आत विमानाचे तिकिट उपलब्ध करून देणार आहे.

या स्टार्टअपचे नाव Railofy आहे. मुंबईतून Railofy अ‍ॅपवर तुम्ही ऑफरचा फायदा घेऊ शकता. जर येथे तुमचे तिकिट वेटींग किंवा RAC आहे तर कंपनी तुमच्यासाठी एयर तिकिट उपलब्ध करणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर रेल्वेचे कन्फर्म तिकिट न मिळाल्यास तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळेल.

या कंपनीची ही सुविधा सध्या फक्त मुंबईतून AC क्लासच्या तिकिटावर उपलब्ध आहे. यासाठी प्रवाशांना 50 रुपयांपासून 500 रुपये देऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.

कंपनीनुसार एकदा रजिस्ट्रेशन केल्यावर प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय तत्काळ तिकिट बुक करण्याची सुविधा मिळेल. ही सुविधा लवकरच देशातील अन्य शहरातसुद्धा उपलब्ध केली जाणार आहे.

तुम्हाला या ऑफरची माहिती https://www.railofy.com/ या लिंकवर क्लिक करून मिळू शकते.