मुंबई-पुण्यात पावसाचा आणखी 2 दिवस ‘मुक्काम’ !

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये पुढील दोन दिवस दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून संपला तरी मुंबई, पुण्यात पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही. थंडी जवळ आली तरी पावसाचा मुक्काम अजूनही कायम असल्याने आता मुंबईकर, पुणेकर वैतागले आहेत. काल मध्यरात्री मुंबई, पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान हवामान खात्याने अंदाज बांधला आहे की मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम कायम राहिलं. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या शहरात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात देखील पाऊस मुक्काम ठोकून आहे.

मागील काही वर्षात हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. हे बदल आपल्या दैनंदिन जीवनात दिसून येत आहेत. तसेच सांगायचे झाल्यास, काही ठिकाणी जोरात पाऊस, तर काही ठिकाणी रखरखीत ऊन हे वातावरणातील बदल ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहेत अशी माहिती पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी दिली.

कश्यपी यांनी सांगितले की यंदा मान्सूनने जूनच्या दुसर्‍या आठवड्यात आगमन केले. पण त्यानंतर काही काळ मान्सूनमध्ये खंड पडला होता. त्यानंतर राज्यातील बहूतांश भाग मान्सूनने व्यापला होता. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात सुरु झालेला पाऊस 16 ऑक्टोबर रोजी परतला होता. मात्र पुन्हा राज्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे सध्याचा हवामान अंदाज लक्षात घेता तर 10 नोव्हेंबरपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाची, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. 10 तारखेनंतर नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हलक्या सरी पडण्याच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Visit : Policenama.com