Raj Kendra Porn Film Case | राज कुंद्राविषयी माहिती देणार्‍या अभिनेत्रीला गुन्हे शाखेचे समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Kundra Porn Film Case |बहुचर्चित अश्लील चित्रफित रॅकेट (Porn Video Racket) प्रकरणात अटकेत (Arrest) असलेल्या राजक कुंद्रा (Rajak Kundra) याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) हिची ६ तास चौकशी केल्यानंतर आता गुन्हे शाखेने (Crime Branch) अभिनेत्री गेहना वशिष्ठ (Actress Gehana Vasisth) हिला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तिच्यासह एकूण तिघांना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने (Property Cell) चौकशीसाठी बोलावले आहे.

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा नवीन अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती गेहना वशिष्ठ हिने एका वेबसाईटही माहिती दिली होती. राज कुंद्रा याच्या या अ‍ॅपमध्ये चॅट शो,(Chat Show)  रिअ‍ॅलिटी शो, (Reality Show) म्युझिक व्हिडिओ (Music Video) आणि फिचर फिल्मचा समावेश करण्यात येत होता. त्यातील एका चित्रपटासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला (Shamita Shetty) भूमिका देण्याचा विचार होता. तर दुसर्‍या एका स्क्रिप्टसाठी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिचा विचार केल्याचे गहना हिने सांगितले.

तिने सांगितले की, राज कुंद्रा याच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा बॉलिफेम या अ‍ॅपविषयी माहिती मिळाली. हे नवीन अ‍ॅप लाँच करण्याचे प्लॅनिंग राज करत होता. आम्ही स्क्रिप्टवरही चर्चा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मी करणार होते आणि त्यांच्या अटकेपूर्वी आम्ही याच विषयावर चर्चा केल्याचे तिने सांगितले. गेहना वशिष्ठ हिच्या या मुलाखतीनंतर आता प्रॉपर्टी सेलने तिला समन्स बजावून चौकशीला बोलावले आहे.

Web Title :  Raj Kundra Porn Film Case | Crime Branch summons actress for giving information about Raj Kundra

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची विजयी सुरुवात;
टोकिओ ऑलपिंकमध्ये पहिल्या सामन्यात सहज केली मात

Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’

NIV Pune Recruitment-2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Mukesh Ambani | चीन आणि अमेरिका इतका श्रीमंत होईल India,
जाणून घ्या मुकेश अंबानी यांनी का केले ‘हे’ वक्तव्य

Supreme Court | पालकांना मोठा दिलासा ! शैक्षणिक शुल्कात 15 % कपात, शुल्क वाढीबद्दल राज्य सरकारला निर्देश