Raj Thackeray on Ajit Pawar | राज ठाकरेंचे अजित पवारांवर टीकास्त्र; म्हणाले – ‘पळून कुणासोबत गेले आणि लग्न कुणासोबत केलं?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray on Ajit Pawar | येथील शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Mumbai) तब्बल दोन वर्षानंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava 2022) पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष (MNS President) राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका (Raj Thackeray on Ajit Pawar) केली. विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) झाल्या. निकालानंतर पहाटे वेगळाच जोडा पाहायला मिळाला. कुणाबरोबर पळून गेल आणि कुणाबरोबर लग्न केलं काहीच कळेना, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

 

राज ठाकरे (Raj Thackeray on Ajit Pawar) म्हणाले, पहाटेचा शपथविधी झाला आणि तेवढ्यात आवाज आला की, हे लग्न होणार नाही. दोघंही हिरमसून घरी. हा सर्व गोंधळ सुरू असताना कुणीतरी म्हणतय मला कडेवर घ्या ना. तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या राजकारणात असे कधी पाहिलं नाही. एकमेकांना शिव्या घालायच्या आणि पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP)-शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असे पक्ष होते. पण निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुखमंत्रीपद (Chief Minister) वाटून घेण्याचा साक्षात्कार झाला. हे मात्र कधी आमच्याशी बोलले नाहीत.

 

 

महाराष्ट्रभर सभा झाल्या तेथेही बोलला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi),
अमित शहा (Amit Shah) यांच्या सभेत बोलला नाही.
पंतप्रधान मोदी यांनी सभेतच भाजपचा मुख्यमंत्री (BJP Chief Minister) होईल असे सांगितले.
त्यावेळीही तुम्ही काहीच बोलला नाही. जसा निकाल लागला की, आपल्यामुळे यांचे
सरकार अडतय हे लक्षात येताच अडीच वर्षाचा विषय पुढे आला.
अडीच वर्षाच कोणाशी बोललात. म्हणे अमित शहा यांच्याशी एकांतात बोललो.
मग बाहेर का नाही बोललात? महाराष्ट्रातील जनतेच मुख्यमंत्रीपद आहे असे असताना
तुम्ही एकांतात का बोलला ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Raj Thackeray on Ajit Pawar | mns raj thackeray slam ajit pawar and uddhav thackeray mns padwa melava 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा