CM फडणवीसांविरोधात मनसे मैदानात, ‘त्या’ व्यंगचित्राला दिलं चोख प्रत्युत्‍तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच भाजपच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. एका व्यंगचित्राच्या माध्यमातून राज नावाची सोंगटी आता कोठे जाणार अशा प्रकारची टीका करण्यात आली होती. या टीकेला मनसेने आता जोरदार प्रतिउत्तर दिलय.

एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘राजभाषेच्या चाहुलीने सत्ताधारी थबकले, फक्त बातमीनेच थापाड्यांचे पाय लटलटले,’ असं ट्वीट मनसेनं केलं आहे.त्यासोबतच हॅशटॅग ‘फ’ वापरण्यात आला आहे. अतिशय व्यंगात्मक पद्धतीने यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीची लढाई प्रत्यक्ष मैदानासोबतच सोशल मीडियातूनही लढली जाणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मनसे विधानसभेच्या निवडणुकांत आपले उमेदवार उतरवणार असून मोठ्या शक्तिप्रदर्शनाने लढणार असल्याची चर्चा आहे. सध्या मनसेची १२२ जागांची तयारी झाली असल्याचे समजते.

कोठे किती जागा लढणार ?

मुंबईत 36 पैकी 36 जागा

ठाणे 24 पैकी 24

नाशिक 15 पैकी 15

मराठवाडा 42 पैकी 22

विदर्भ 62 पैकी 15

कोकण 15 पैकी 10

उत्तर महाराष्ट्र – चाचपणी सुरू

Visit : Policenama.com