Raju Shetty | ठाकरे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पूरग्रस्तांना पुरेशी मदत मिळाली नाही असा आरोप करत, पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सुरु केलेल्या पंचगंगा परिक्रमा यात्रेची आज सांगता झाली. यावेळी त्यांनी ज्यांना आम्ही आणलं ते महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) एफआरपीचे (FRP) तीन टप्पे करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक असल्याची टीका राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दखल घतेली असून राजू शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावलं आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढली. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर (Central Government) ताशेरे ओढले. मंत्र्यांना गाडी घ्यायला, ऑफिस सजवायला पैसे आहेत. मग पूरग्रस्तांना मदत करायला पैसे नाहीत का ? असा सवाल त्यांनी केला.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

केंद्र सरकार जर दुजाभाव करत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रपती भवनावर (Rashtrapati Bhavan) मोर्चा काढावा, जर तुम्ही आंदोलनाला जात नसाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 रेल्वे घेऊन आंदोलनासाठी जाईल. केंद्राला कोणी तरी ठणकावून सांगितले पाहिजे, असा आक्रमक पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला.

केंद्र आणि राज्य आंदोलन बेदखल करण्यासाठी वेगवेगळे विषय उकरुन काढत आहेत.
शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच एकमत आहे.
सरकारशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा आम्ही आक्रमक होणार. आज मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली.
मला बैठकीला बोलावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी तीन वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे.

 

Web Title : Raju Shetty | thackeray governments decision is dangerous for farmers raju shettys direct attack

 

Male Infertility | लाईफस्टाइलसह इतर अनेक कारणांमुळे कमी होतेय पुरुषांची फर्टिलिटी, रिसर्चमध्ये खुलासा

Mahindra Thar 12 नव्हे, अवघ्या 6 लाखात खरेदी करा; वॉरंटीसह 100 % फायनान्स देईल कंपनी, जाणून घ्या

Income Tax | पेन्शनचे उत्पन्न असलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना भरावा लागणार नाही ITR, फॉर्म नोटिफाईड