जिल्हा प्रशासनावर राज्यसभा खा. फौजिया खान यांची ‘नाराजी’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –  परभणी शहरातील नांदखेडा रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी नाराजगी व्यक्त केली. राज्यसभा खासदार म्हणून निवडीनंतर त्यांनी प्रथमच पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. कोरोना संकट काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजनेचे नियोजन कोलमडलेल्या चा आरोप खासदार फौजिया खान यांनी केला. जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. मात्र प्रशासन गंभीर दिसून येत नसल्याचे खासदार फौजिया खान यांनी म्हटले आहे. परिणामी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. स्थितीत धोकादायक बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे त्यांनी आरोग्य यंत्रणेवर कुणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे त्या म्हणाल्या.

कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत परभणी महानगरपालिकेकडून विशेष काळजी घेतली जात नसल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच जिल्हा प्रशासन व मनपाच्या कारभाराबद्दल याप्रसंगीत्यांनी नाराजीही व्यक्त केली. उदयन्मुख विचार व्यक्त करताना. त्या म्हणाल्या. पुढील काळात जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योगा शिवाय विकास शक्य नसल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. शहरातील नांदखेडा रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे फौजिया खान म्हणाल्या. फौजिया खान या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून नुकतीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.