राम गोपाल वर्मांनी शेअर केलं ‘Arnab : The News Prostitute’ सिनेमाचं फर्स्ट लुक मोशन पोस्टर ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर जबरदस्त रिपोर्टींग करणारे पत्रकार अर्नब गोस्वामी हे अनेक लोकांच्या निशाण्यावर आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांना हा अंदाज अजिबात आवडलेला नाही. खूप आधीच त्यांनी अशी घोषणा केली होती की, ते अर्नब यांच्यावर सिनेमा तयार करणार आहेत. अशात आता वर्मांनी त्यांच्या या सिनेमाचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केलं आहे.

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटरवरून सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं की, अर्नब द न्यूज प्रॉस्टिट्युटचं फर्स्ट लुक पोस्टर समोर आलं आहे. आता देशाला तेच समजेल जे त्याला जाणून घ्यायचं आहे.

लॉकडाऊनमध्ये राम गोपाल वर्मांनी एकापाठोपाठ असे अनेक सिनेमे रिलीज केले आहे. त्यांचे सिनेमे सस्पेंस आणि थ्रिलरनं भरलेले असतात. यात बोल्डनेसचा तडकाही मारण्यात आलेला आहे. परंतु आता मात्र ते त्यांच्या लाईनपेक्षा हटके असा सिनेमा तयार करणार आहेत. राम गोपाल वर्मांनी शेअर केलेलं हे फर्स्ट लुक मोशन पोस्टर शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हे पोस्टर शेअर केलं आहे. काहींनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. अद्याप या पोस्टरला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like