नवीन राम मंदिराची संरचना तयार ! असं असेल राम मंदिर

मुंबई : वृत्तसंस्था – मागील अनेक दशकांपासून चर्चित असलेल्या अयोध्या प्रकरणाचा आज निकाल लागला. अयोध्येमध्ये GB राम मंदिर बाधण्याची दारे आज सुप्रीम कोर्टाने खुली केली. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे 2.77 एकर जागा रामलल्लाच्या मंदिरासाठी मिळाली. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 2.77 एकर जागेवर नवं राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असं असेल नवं राम मंदिर
बांधण्यात येणारे नवे राम मंदिर हे दोन मजल्यांचे असणार आहे. मंदिरातल्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामांची मूर्ती असणार आहे. तर मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रभू श्रीरामांचा दरबार असणार आहे. मंदिराच्या घुमटावर धर्मध्वजाची उभारणी केली जाणार आहे. एकूण 212 खांबावर हे मंदिर उभारले जाणार आहे. नव्या राम मंदिराची लांबी 275 फुट, उंची 135 फुट, रुंदी 125 फुट इतकी असेल. एकूण 36 हजार 450 चौरस फुट एवढ्या क्षेत्रफळावर राम मंदिर उभारले जाणार आहे.

राम मंदिर निर्मितीचा प्लॅन
निकाल देताना सुप्रीम कोर्टाने 3 महिन्यांमध्ये ट्रस्ट निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. या राम मंदिर ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. मंदिरासाठी उत्तर प्रदेश सरकारचं 500 कोटींच बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम मंदिराच्या 8 किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा, हॉटेल्स बांधण्यास परवानगी नसणार आहे.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराची उभारणीच्या कामास 2020 मध्ये सुरुवात होईल. तर 2023 मध्ये मंदिर उभारणीचे काम पूर्ण करण्याचे लक्ष सरकारचे आहे. दरम्यान मंदिराचं बहुतांश स्ट्रक्चर हे दगडाचे असेल. त्यासाठी लागणारे दगड तासण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत 60 टक्के दगड तासण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिरासोबतच आयोध्येच्या पुनर्विकासाची योजना आखण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com