‘महाविकास आघाडी सरकारला जनता नापास ठरवेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन सरकारला नापास करेल असे ट्विट करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी वीजबिल माफी, कोरोना संकट, कंगना राणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन आठवले यांनी सरकाररला घेरले. ‘कोरोना संकटाचा मुकाबला करताना निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई, वीजबिल माफीवरुन जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक, अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी प्रकरणी दिसलेली सुडबुद्धी ही राज्य सरकारला शोभणारी कामगिरी नसल्याचे आठवले म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणी दिलेला निकाल राज्य सरकारला आत्मचिंतन करायला लावणारा असल्याचेही ते म्हणाले.

धमकीची भाषा वापरणे लोकशाहीला मास्क…

लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो. प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर द्यायचे असते. त्यांना उलटपक्षी प्रश्न का विचारतो म्हणून जाब विचारायचा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धवून मागे लागणार अशी विरोधकांना धमकीची भाषा वापरणे ही भूमिका समर्थनीय नसून लोकशाहीला मारक असल्याचे आठवले म्हणाले.