नवरात्रीपासून नव्या जागेत होणार रामललाचं ‘दर्शन’, तयार होणार राम मंदिराची ‘ब्ल्यू-प्रिंट’

आयोध्या : वृत्तसंस्था – वासंतिक नवरात्रीपासून रामललाचे दर्शन नव्या ठिकाणी होणार आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण आणि प्रशासकीय समितीचे चेयरमन नृपेन्द्र मिश्र यांनी रामललाच्या स्थान परिवर्तनाला हिरवा झेंडा दाखवला आहे. या नव्या ठिकाणी रामललाच्या संरक्षण व्यवस्थेचा नवा अराखडा तयार केला जात आहे. तर, श्री राम जन्मभूमी परिसरात राम मंदिर निर्मितीसाठी रामनवमीपूर्वी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञान, तज्ज्ञांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून 25 मार्चपर्यंतचा वेळ मागितला आहे. 70 एकरातील राम जन्मभूमी परिसरासाठी मास्टर प्लानसुद्धा तज्ज्ञ तयार करण्यात येणार आहेत.

नृपेन्द्र मिश्र शनिवारी तंत्रज्ञांसह रामजन्मभूमीत आले होते. सर्वात आधी त्यांनी रामलला यांचे गृर्भगृहात जाऊन दर्शन घेतले. यानंतर रामललाच्या स्थान परिवर्तनासाठी प्रस्तावित नवीन स्थळाची विश्वस्त आणि अधिकार्‍यांसोबत पाहणी केली. त्यांनी हनुमानगढीचे सुद्धा दर्शन घेतले.

अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीच करणार
प्रस्तावित ठिकाण स्वच्छ करून समतोल करण्यात आले आहे. तसेच रामललाचे अस्थायी मंदिराचे ठिकाण, मार्गिका, रस्ता रेखांकित करण्यात आले आहे. मिश्र आणि त्यांच्या सोबतच्या तंत्रज्ञांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी सर्व भूमिका समजावून सांगितली. यानंतर भवनात झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांनी सुरक्षा व्यवस्थेसबंधी माहिती दिली. बैठकीत प्रस्तावित स्थळावर रामललाच्या भोग-राग व्यवस्थेसाठी कोठार आणि भंडारसंबंधी विचारविनिमय केला.

70 एकर परिसराची कारने केली पाहणी

रामजन्मभूमीचा विस्तर्ण परिसर विविध भागात आहे. तो एका दृष्टीक्षेपात पाहणे अशक्य आहे. याचे एक टोक त्रिदंडदेव संस्कृत महाविद्यालयाच्या येथे आहे. तर दुसरे टोक गोकुल भवन. तिसरे टोक क्षीरेश्वरनाथ महादेव मंदिराच्या पुढे युसुफ आरा मशीन येथे आहे. तर चौथे टोक जुन्या विश्वामित्र आश्रमाजवळ आहे. या परिसराची पाहणी आणि सुरक्षा व्यवस्थेच्या देखरेखीकरता बुलेटप्रूफ कारसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. समितीचे चेअरमन यांनी ट्रस्टचे महासचिव आणि तंत्रज्ञांसोबत या परिसराची पाहणी कारमध्ये बसून केली. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी या परिसराची माहिती दिली.

तंत्रज्ञांची टीम मुख्य आर्किटेक्टसोबत मार्चमध्ये पुन्हा येणार
निर्माण समितीचे चेअरमन आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी नृपेन्द्र मिश्र व राम मंदिर मॉडलचे मुख्य वास्तुतज्ज्ञ चंद्रकांत भाई सोमपुरा यांची भेट मार्चमध्ये होणार आहे. ट्रस्टचे महासचिव श्री राय यांनी ही माहिती दिली. भेटीची तारीख होळीनंतर ठरवण्यात येणार आहे. या भेटीत तंत्रज्ञांची टीमही उपस्थित राहणार आहे आणि त्यांनंतर ही टीम मुख्य वास्तुतज्ज्ञ श्री सोमपुरा यांच्या सोबत रामजन्मभूमी परिसराची पाहणी करतील.