Lockdown मध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक उद्योगधंदे बंद होते. आता अनलॉकमध्ये काही उद्योगधंदे सुरु असले तरी काही बंद आहेत. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. याचाच फायदा कही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत. एका तरुणीला नोकरी देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर पीडित मुलीला डांबून ठेवण्यात आले.

औरैया जिल्ह्यातील रहिवासी महिलेने नोकरीच्या बहाण्याने तिला नोएडा येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने बुधवारी फफुंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, तुर्कीपूर येथे राहणाऱ्या संतोष बाबू यांचा मुलगा प्रताप यादव याने चांगली नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून तरुणीला नोएडा येथे घेऊन गेला.

या ठिकाणी एका खोलीत तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरी आणून ओलीस ठेवले. आरोपीव्यतिरिक्त त्याचे वडील संतोष बाबू, आई शकुंतला आणि बहिण संध्या यांनी तरुणीला मारहाण केली. 2 जून रोजी संधी मिळाल्यावर तिने मोबाइलवरून घटनेची माहिती वडिलांना दिली. यानंतर तिचे वडिल फफूंद पोलिसांसह तेथे आले आणि तिला मुक्त केले. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.