Video : दुर्मिळ पिवळ्या कासवानं सोशल मिडीयावर उडवली धमाल, जाणून घ्या ‘रहस्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कासवाची दुर्मिळ प्रजाती दिसून आली, ज्याचा रंग पिवळा आहे. ट्विटरवर पोस्ट केलेला  हा व्हिडिओ अनेक लोकांनी पहिला असून यावर आपापली प्रतिक्रिया देत आहेत. पिवळ्या कासवाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, कासव पाण्याच्या पात्रात पोहत आहे.

हा व्हिडिओ सुशांत नंदा आयएफएसच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला असून, त्यात म्हटले आहे की, हा दुर्मिळ पिवळा कासवा ओडिशातील बालासोर येथून रेस्क्यू करण्यात आला आहे. हा बहुधा अल्बिनो असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अल्बिनो म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे प्रजातीच्या जीवातील रंगाचा बदल. हे सापांमध्ये अधिक दिसून येते. ट्विटवर एका वापरकर्त्याने सांगितले की या कासवला अल्बिनो इंडियन फ्लॅपशेल म्हणतात आणि तो 10,000 कासवांपैकी एक असतो. जगण्याची शक्यताही खूप कमी आहे.