Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | शिंदे गटाला महाधक्का! उदय सामंतांच्या भावाला डावलून नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपाची उमेदवारी

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) हे मागील अनेक महिन्यांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून अटोकाट प्रयत्न करत होते. ही जागा शिवसेनेची (Shivsena) असल्याने त्यावर शिंदे गटाचा हक्क देखील मजबूत होता. परंतु, ही संधी देखील शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) गमवावी लागली आहे.

भाजपाने येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा शिंदे गटाला महाधक्का असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपाने नारायण राणे यांना रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघात नारायण राणे विरूद्ध शिवसेना ठाकरे पक्षाचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात सामना रंगणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा नेते नारायण राणे हे उद्या शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाने हा मतदारसंघ देखील शिंदे गटाकडून खेचून घेतला आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या जवळपास निम्म्या खासदारांना उमेदवारी मिळालेली नाही.

आता शिंदे गटातील प्रमुख नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाच उमेदवारी नाकारल्याने नाराजी नाट्य उभे राहू शकते. सध्यातरी किरण सामंत यांना देवेंद्र फडणवीस यांनी शांत केल्याचे बोलले जात आहे. मात्र, किरण सामंत हे उमेदवारीसाठी अतिशय आक्रमक झाल्याचे मागील काही दिवसांपासून दिसत होते.

मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले,
तेव्हाच सामंत बंधुंची धाकधुक वाढली होती. अखेर नारायण राणेंची सरशी झाली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या उमेदवारीवर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे
की, नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत त्यांचे काम करणार आहेत.
किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील, असे सामंत म्हणाले.

दरम्यान, राणेंच्या विजयासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंसाठी रत्नागिरीतील गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदान
येथे २४ एप्रिलला अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली