PMC बँकेच्या ग्राहकांना RBI कडून मोठा दिलासा ! आता मिळाली 1 लाख रूपये काढण्याची सूट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) पुढील 6 महिन्यासाठी अनेक प्रतिबंध आणले आहेत. मात्र, केंद्रीय बँकेने पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा देत पैसे काढण्याची सध्याची मर्यादा 50,000 रुपयांवरून वाढवून 1 लाख रुपये केली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, या सवलतीनंतर सुमारे 84 टक्के ग्राहक आपली पूर्ण रक्कम बँकेतून काढू शकतात. आरबीआयनुसार, पीएमसीवर 22 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व प्रतिबंध पहिल्याप्रमाणेच लागू राहतील.

सप्टेंबर 2019 मध्ये समोर आला पीएमसी बँक फ्रॉड

आरबीआयने म्हटले की, बँकेला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्व हितचिंतकांशी चर्चा केली जात होती, परंतु कोविड-19 आणि सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे अडथळे येत आहेत. याशिवाय बँकेचे नेट वर्थ सुद्धा लागोपाठ घटणे आणि कर्ज वसूलीत जारी कायदेशिर प्रक्रियेमुळे बँकेसाठी कोणताही प्रस्ताव आणणे आव्हानात्मक झाले आहे. पीएमसी बँक घोटाळा सप्टेंबर 2019 मध्ये समोर आला होता.

रिझर्व्ह बँकेला आढळले होते की, सप्टेंबर 2019 मध्ये पीएमसी बँकेने कथित पद्धतीने कंगाल एचडीआयएलला दिलेले 4,355 करोड रूपये लपवण्यासाठी काल्पनिक खाती बनवली आहेत. आरबीआयनुसार पीएमसी बँकेने एचडीआयएलसह 44 लोन अकाऊंट लपवण्याचे फसवणुकीचे कृत्य केले आहे. एवढेच नव्हे, पीएमसी बँकेने कोर बँकिंग सिस्टमध्ये सुद्धा छेडछाड केली होती. यामुळे या काल्पनिक अकाऊंटपर्यंत निवडक स्टाफ मेंबर्सच पोहचू शकत होते.

पीएमसी बँकेच्या या खातेधारकांना होणार फायदा

पीएमसी बँकेत लोकांचे 11000 करोड रूपये जमा आहेत. या सहकारी बँकेत जास्तकरून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांची खाती आहेत. रिक्षा चालकापासून टॅक्सी ड्रायव्हर, छोटे व्यापारी, पेन्शनर्सची खाती बँकेत आहेत. आता आरबीआयकडून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आल्याने या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खातेधारकांमध्ये सिनियर सिटीजनसुद्धा मोठ्याप्रमाणात आहेत. सिनियर सिटीजन अनेक महिन्यांपासून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवण्याची मागणी करत होते. त्यांचे म्हणणे होते की, त्यांच्याकडे कमाईचे दुसरे कोणतेही साधन नाही. तर, कोरोना संकट काळात पैसे काढता येत नसल्याने त्यांची स्थिती आणखी बिकट झाली होती.