घरातील व्यक्तीच्या मोठ्या घोरण्याचा त्रास होतोय, ‘या’ उपायांनी नक्की बंद होईल

पोलीसनामा ऑनलाइन – जगातल्या कोणत्याही भागात गेलं तरी घरातील एकतरी व्यक्ती मोठ्याने घोरत असल्याचे दिसून येते. त्या एका व्यक्तीमुळे आजूबाजूला झोपलेल्या लोकांची झोप उडते. पुरुषांसोबत महिलांदेखील घोरण्याच्या बाबतीत पुढे असतात. काही लोकं रोज घोरतात, तर काही लोक जास्त थकवा आला असेल तर त्या दिवशी झोपत घोरत असतात. काही लोकांची घोरण्याची पद्धत एवढी विचित्र असते की ते घोरल्यानंतर एखाद्या वाघाने डरकाळी फोडल्यासारखे लोक दचकून उठतात.

झोपताना एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जे वाईब्रेशन्स क्रियेट होत असतात, त्यांना घोरणं असे म्हटले जाते. सगळीकडे घोरण्याची पद्धत गंमतीत घेतली जाते. पण तुम्हाला हे माहित आहे का जास्त घोरण्याची सवय ही मोठ्या आजाराचं लक्षण देखील असू शकते.

लोक का घोरतात
एका संशोधनानुसार, घोरण्याची अनेक कारणं असू शकतात. एनाटॉमिकल स्टँडपाँइट नुसार नाक आणि गळा उघडा असल्यामुळे घोरण्याची क्रिया होते. झोपेत असताना आपल्या मानेच्या मासपेशी रिलॅक्स होत असतात. कधीकधी इतक्या रिलॅक्स होत असतात की एरवी काही प्रमाणात बंद होतात. त्यामुळे हवा बाहेर जाण्यासाठी असलेली नलिका आकुंचन पावते. ज्यावेळी शरीराला पर्याप्त ऑक्सिजन मिळत नाही त्यावेळी मेंदू द्वारे शरीराला संदेश दिला जातो. त्यामुळे अनेकवेळा आपली झोप मोड होते. या अहवालानुसार 40 टक्के प्रौढ लोक घोरतात. ज्या लोकांना टॉन्सिल्स आणि जीभ मोठी असते किंवा ज्या लोकांच्या मानेच्या आजूबाजूला जास्त वजन असते अशी लोक जास्त घोरतात. जर तुम्हाला घोरण्याच्या सवयीतून सुटका करुन घेयची असेल तर या उपायांचा वापर अवश्य करा.

सरळ झोपण्यापेक्षा डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.
जर तुमच वजन जास्त असेल तर व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे.
धुम्रपान बंद करा.
झोपण्याआधी मद्याचं सेवन करू नका.
आलं आणि मधाच्या चहाचे सेवन करा.
राईच्या तेलाचा आहारात समावेश करा.