‘बिग बी’ अमिताभसोबतच्या नात्याबद्दल रेखानं सोडलं मौन ! म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन अ‍ॅक्ट्रेस रेखा यांची लव्ह स्टोरी साऱ्यांनाच माहिती आहे. रेखानं आता अमिताभ आणि त्यांच्या नात्यावरील मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत रेखानं यावर भाष्य केलं आहे.

सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये रेखाला अमिताभवरून प्रश्न विचारला असता रेखानं अप्रत्यक्ष उत्तर दिलं. ती म्हणाली की, ही भूतकाळातील गोष्ट आहे. यानतंर तिला जया बच्चनबद्दल प्रश्न विचारला असता रेखा म्हणाली, “जया एक बिचारी किंवा इंसिक्योर महिला आहे असं मला वाटत नाही.” यानंतर सिमीनं जेव्हा प्रश्न विचारला की, जेव्हा नवरा विश्वास देतो तेव्हा स्त्रीला सुरक्षित वाटतं. यावर रेखा म्हणाली की, हे आवश्यक नाहीये. रेखाला समजलं होतं की, सिमीचा हा प्रश्न जया आणि अमिताभ यांच्याबद्दल आहे. सिमिचे हावभावदेखील रेखाला समजले होते.

तरीही आहे अमिताभवर प्रेम
मुलाखतीत बोलताना जेव्हा रेखाला अमिताभ सोबत असलेल्या नातेसंबंधांबद्दल आणि लोक काय म्हणतात यावर प्रश्न विचारला गेला तेव्हा रेखा म्हणाली, “लोक काय म्हणतील यानं मला काहीही फरक पडत नाही. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मी याला कमीपणानं घेत नाही. कधी कधी लोक असंही म्हणतात की, रेखा वेडी आहे जी त्यांच्या प्रेमात पडली आहे. परंतु लोका काय म्हणतात किंवा काय विचार करतात याची मला पर्वा नाही.” असंही रेखा म्हणते.