औरंगाबादमध्ये MGM रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना कालावधीत जीवाची बाजी लावून काम करणार्‍या डॉक्टरांवर हल्ले होत असल्याची सातत्याने घडत आहे. कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यामुळे औरंगाबादमध्ये एमजीएम रुग्णालयात नातेवाईकांनी एका महिला डॉक्टरला मारहाण केली आहे.

शहरातील महात्मा गांधी मिशन, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. काल रात्री हा प्रकार घडला आहे. एमजीएम रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. पण त्यावर समाधान न झाल्यामुळे त्यांनी थेट मोर्चा कोरोनाबाधित कक्षाकडे वळवला. कोरोनाबाधित कक्षात घुसून नातेवाईकांनी महिला डॉक्टरालाच मारहाण केली. यावेळी नातेवाईकांनी कोरोना कक्षात साहित्यांची तोडफोड केला. कोरोना कक्षाचीच नासधूस करण्यात आली. या प्रकरणी एमजीएम प्रशासनाने सिडको पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एमजीएम प्रशासनाच्या तक्रारीवरुन मृत रुग्णाच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा केला आहे.