Jio चा धमाकेदार प्लॅन, ‘रिचार्ज’ संपल्यानंतर देखील एकदम ‘फ्री’मध्ये मारत रहा ‘गप्पा-गोष्टी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  लॉकडाऊनच्या दरम्यान रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी एक उत्तम ऑफर दिली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे जर आपण प्लॅन रिचार्ज करण्यास सक्षम नसाल तर ही योजना आपल्यासाठी कोणत्याही लॉटरीपेक्षा कमी नाही. रिलायन्स जिओने आपल्या युजर्सला मोफत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. जिओ युजर्ससाठी उत्तम ऑफर देण्यात आल्या आहेत. चला तर मग या ऑफरबद्दल जाणून घ्या..

प्रीपेड युजर्ससाठी विशेष योजना

जिओने प्रीपेड युजर्ससाठी एक विशेष प्लॅन सादर केले आहे. या प्लॅनमध्ये, युजर्सची वैधता संपल्यानंतर, त्यांना 24 तास कॉल करण्याची सुविधा मिळते. हा लाभ केवळ 24 तासासाठी दिला जात आहे. युजर्सचे प्लॅन संपल्यानंतर, त्यांना केवळ पुढील 24 तास जिओ नेटवर्कवर कॉल करण्याचा फायदा मिळू शकेल. ही ऑफर खूप फायदेशीर आहेत जे लॉकडाऊनमुळे त्वरित प्लॅन रिचार्ज करु शकत नाही अशा परिस्थितीत त्यांना रीचार्ज करण्यासाठी 24 तास लागतात.

रिलायन्स जिओची नवीन अनलिमिटेड कॉलिंग योजना

जिओने अलीकडेच 999 रुपयांची नवीन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत जिओ 84 दिवसांच्या वैधतेसह एकूण 252 जीबी डेटा ऑफर करत आहे. या योजनेत Jio-to-Jio अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 3000 मिनिटे मिळणार आहे.