Jio चा 129 रुपयांचा ‘प्लॅन’ बनला सर्वात ‘स्वस्त’, कारण जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओचा 129 रुपयांचा प्रीपेड प्लान आता कंपनीचा सर्वात स्वत रिचार्ज प्लान बनला आहे. कारण, जिओने 98 रुपयाचा प्लान बंद केला आहे. त्यानंतर आता ग्राहकांना आपली सुविधा सुरु ठेवण्यासाठी कमीत कमी 129 रुपयाचे रिचार्ज करावे लागणार आहे. जिओचा हा प्लान 98 रुपयाच्या जुन्या प्लानपेक्षा 31 रुपयानी महाग आहे.

जिओचा 129 रुपयाचा प्लॅन

रिलायन्स जिओचा 129 रुपयाच्या प्लानची वैधता 28 दिवसांची असणार आहे. यामध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 1 हजार नॉन जिओ मिनिट्स मिळणार आहेत. तसेच ग्राहकांना एकूण 2 जीबी डेटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे 300 एसएमएस आणि जिओच्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

कसा होता जिओचा 98 रुपयाचा प्लान

रिलायन्स जिओ कंपनीने 98 रुपयांचा प्लान वेबसाईट आणि अॅप या दोन्हीवरून काढून टाकला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ ते जिओवर फ्री कॉलिंग, 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस मिळत होते. तसेच अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 6 पैसे प्रति मिनिट आययूसी चार्ज लागत होता. या प्लानची वैधता 28 दिवसांची होती. या प्लानला बंद केल्यानंतर आता रिलायन्स जिओचा स्वस्त प्रीपेड प्लान 129 रुपयांचा प्लान बनला आहे.

एअरटेल आणि व्होडाफोन 98 रुपयाचा प्लान

एअरटेल आणि व्होडाफोनने नुकताच आपला 98 रुपयाच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. या दोन्ही कंपन्यांनी या प्लानमध्ये आता 12 जीबी डेटा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. प्लानमध्ये कोणत्याही प्रकारची कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळत नाही.