रक्षाबंधन 2020 : आपल्या भावाला ‘राखी’ बांधताना ताटात ‘या’ 7 गोष्टी ठेवणं मानलं जातं ‘शुभ’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रक्षाबंधनाचा सण हा एक असा उत्सव आहे ज्याची प्रत्येक भाऊ आणि बहीण आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधनात बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांचे नाते आणखी घट्ट करतात. यावेळी रक्षाबंधन हा सण 3 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्ताची काळजी घेतली जाते. पण या व्यतिरिक्त राखीचे ताट देखील खूप महत्वाचे असते. या दिवशी बहिणी राखीचे ताट अत्यंत प्रेमळपणे सजवतात. ज्यातून त्या भावाची आरती करतात. मग राखी बांधतात. राखीच्या ताटात कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात ते जाणून घेऊया.

राखीच्या ताटामध्ये या 7 वस्तू ठेवा

– कुंकू: हिंदू धर्मात प्रत्येक चांगल्या कार्यात कुंकवाचा वापर शुभ मानला जातो. कुंकवाचा लाल रंग प्रेम, उत्साह, धैर्य, परमानंद आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच राखी बांधण्यापूर्वी भावाला कुंकवाचा टिळा लावला जातो. तुम्ही रोली, कुंकू किंवा हळदीने टिळा लावू शकता.

– हळद: पूजा-अर्चनामध्ये, टिळा लावण्यास हळदीचा उपयोग देखील शुभ मानला जातो. यामुळे भावाचे भाग्य उजळते आणि त्याला समृद्धी प्राप्त होते.

– अक्षता: अक्षताच्या रूपात तुम्ही तांदूळ वापरु शकता. फक्त तांदळाचे तुकडे झालेले नसावे याची खात्री करुन घ्या. भावाला कुंकू, हळद आदींचा टिळा लावून तांदूळ लावावेत.

– दिवा: भावाला टिळा लावल्यानंतर दिवा लावून आरतीने ओवाळणे शुभ मानले जाते.

– मिठाई: भावाच्या आयुष्यात नेहमी गोडवा टिकून राहावा म्हणून त्याच्या आवडीची मिठाई देखील ताटात ठेवा.

– राखी: संरक्षण आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखीस आपल्या ताटामध्ये ठेवा. जर तुम्हाला राखी विकत घेता आली नसेल तर आपण कलावा ला देखील राखी म्हणून बांधू शकता.

– राखी बांधताना या मंत्रांचा करा उच्चार

असा विश्वास आहे की भावाला राखी बांधताना मंत्र पठण करणे शुभ आहे. अशा परिस्थितीत, आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना आपण हे मंत्र पठण करू शकता.

येन बद्धो बली राजा, दानवेन्द्रो महाबल:।

तेन त्वाम प्रति बच्चामि, रक्षे! मा चल, मा चल।