पिंजर्‍यातील बंद पक्ष्यांना सोडून द्या, सुधारेल तुमचा ‘राहु’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पिंजर्‍यांत कैद असलेल्या एखाद्या पक्षाला सोडून दिले तर ते लाभदायक ठरू शकते का, तुम्ही म्हणाल होय, त्या पक्षासाठी लाभदायक आहेच. कशाला एखाद्या पक्षाला कैद करून ठेवायचे. आता आपण ज्योतिष बाबत बोलूयात, ज्योतिष शास्त्रानुसार सुद्धा पिंजर्‍यातील बंद पक्षाला सोडल्याने लाभदायक ठरते. हे कसे लाभदायक आहे आणि कोणता ग्रह यामुळे थेट प्रभावित होतो, ते जाणून घेवूयात…

राहू-केतू हे छायाग्रह आहेत, परंतु याचा जनजीवनावर खास परिणाम दिसून येतो. सूर्य आणि चंद्रावरच जीवन आधारित आहे. याचे कटाव बिंदू सुद्धा खुप महत्वपूर्ण असतात. ज्योतिषमध्ये याचा प्रभाव अत्यंत रहस्यमय असतो आणि नेहमी तो लक्षात येत नाही. 23 सप्टेंबर 2020 पासून राहू वृषभ राशीत वक्री झाला आहे, अशात सामान्य जीवनावर राहूचा कसा परिणाम असेल ते जाणून घेवूयात…

राहूचा जीवनावर परिणाम

राहू व्यक्तीमध्ये नकारात्मक उर्जा निर्माण करतो. व्यक्तीचे विचार, खाणे-पिणे इत्यादी दुषित होते. असे लोक फास्ट फूड, थंडपेय आणि नशेच्या आधीन होतात. त्यांची दिनचर्या अतिशय अनिश्चित असते. कौटुंबिक जीवन चांगले नसते, नेहमी विवाह तणावाचे कारण बनतो.

राहूला पॉझिटिव्ह करण्याचे उपाय

1 नियमित सकाळी ब्रश केल्यानंतर तुळशीची तीन पाने खा.
2 स्नान केल्यानंतर सफेद चंदन मस्तक, कंठ आणि नाभीवर लावा.
3 जेवण नेहमी पूर्व दिशेला तोंड करून करा.
4 शनिवारी पिंजर्‍यात कैद पक्षाला मोकळे करा.
5 गळ्यात तुळशीमाळा घाला.
6 घर आणि दुकानातून निरूपयोगी वस्तू हटवा.
7 विचार पॉझिटिव्ह ठेवा.
8 दुसर्‍यांना मदत करा.

डिसक्लेमर

या मजकूरातील कोणतीही माहिती/साहित्य/गणनेची अचूकता किंवा विश्ससनीयतेची खात्री आम्ही देत नाही. विविध माध्यमं/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/नियम/धर्मग्रंथांमधून संग्रहित करून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती पोहचवणे आहे, याचा वापर करणार्‍यांनी ही केवळ माहिती समजावी. याशिवाय, याच्या कोणत्याही उपयोगाची जबाबदारी स्वता उपयोगकर्त्याची राहील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like