राम जन्मभूमीत सपाटीकरणाच्या उत्खननात मिळाले खांब, प्राचीन विहीर आणि मंदिराची चौकट

अयोध्या : राम जन्मभूमीत सपाटीकरणाच्या कामादरम्यान मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. यामध्ये मंदिराचा घुमट, मूर्तीयुक्त दगडाचे खांब, प्राचीन विहीर, मंदिराची चौकट आदीचा समावेश आहे.

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून लॉकडाऊनचे पालन करत गाभार्‍याच्या सपाटीकरणारचे काम केले जात आहे. जेसीबीने उत्खनन केले जात आहे. ज्यामध्ये मंदिराचे प्राचीन अवशेष मिळाले आहेत. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे राम मंदिर निर्माणाच्या कामाला उशीर होत होता. ज्यामुळे मंदिरात काम सुरू करण्यात आले. यासंदर्भात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्रेसनोट जारी केली आहे.

यापूर्वी अयोध्येत पुजार्‍यांनी मागणी केली होती की, मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात यावे. त्यांनी वैदिक ब्राह्मणांसाठी आर्थिक पॅकेजची सुद्धा मागणी केली होती, कारण लॉकडाऊनमुळे भाविक येत नसल्याने दक्षिणा मिळत नसल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे.

अयोध्या संत समितीचे अध्यक्ष महंत कन्हैया दास यांनी म्हटले की, जर बाजार आणि दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे, तर मंदिर अजूनही बंद का आहे? आम्ही मागणी करतो की, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांतर्गत मंदिरेसुद्धा या पवित्र भूमित उघडण्याची परवानगी द्यावी.