दृष्टीहीन व एड्सग्रस्त मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मधील दृष्टिहीन विद्यार्थिनींनी आणि ‘ममता फाउंडेशन (कात्रज) मधील एड्सग्रस्त मुलांनी ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला. ‘हेल्पिंग हॅण्ड’ ट्रस्टने शाळेच्या १२० विद्यार्थिनींना आणि ५० एड्सग्रस्त मुलांना ब्लॅंकेट, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. झेंडे आणि फुगे यामुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते, अशी माहिती ‘हेल्पिंग हॅण्ड’ शिवतीर्थ प्रतिष्ठाण ट्रस्टचे गिरीश गुरनानी, उमेश गिरासे, अमोल गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली.

या उपक्रमाचे १५ वे वर्ष होते. याप्रसंगी ‘पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मधील दृष्टिहीन विद्यार्थिनींना आणि ‘ममता फाउंडेशन (कात्रज) मधील एड्सग्रस्त मुलांना खाऊ देण्यात आला.

यावेळी रोहन जोरी, विवेक जोरी, गोविंद गुप्ता, देवेंद्र गोगावले, प्रीतम पायगुडे, दिनेश राठी, विनायक वरपे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘हेल्पिंग हॅण्ड’, शिवतीर्थ प्रतिष्ठाण ट्रस्टचे गिरीश गुरनानी, उमेश गिरासे, अमोल गायकवाड यांनी ‘पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) शाळेला लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी आणि धान्य वाटप केले. यामध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, हँडवॉश, ५० किलो गहू, ४० किलो तांदूळ, ३५ किलो गव्हाचे पीठ यांचा समावेश होता. तसेच ‘ममता फाउंडेशन (कात्रज) मधील एड्सग्रस्त मुलांना देखील जीवनावश्यक गोष्टी वाटण्यात आल्या.

‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाते. झेंडा, फुगे, खाऊ मिळाल्यानंतर दृष्टिहीन विद्यर्थिनीं आणि पीडित मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता, असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.