मस्तच ! N-95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांनी शोधला ‘हा’ मार्ग !

ह्युस्टन : वृत्तसंस्था – कोरोना संसर्ग होण्याचा धोका अजूनही कामय आहे. अशात एन 95 मास्कसारख्या संरक्षक उपकरणाच्या अभावामुळं आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचा पुनर्वापर करावा लागत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी त्यावर तोडगा काढला आहे. एन 95 मास्क पुन्हा वापरात आणण्यासाठी उष्णता आणि आर्द्रतेचा वापर हे मास्क पुन्हा निर्जंतुक करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

ऊर्जा विभागानं एसएलसी नॅशनल एक्सिलिरेटरर लेबोरेटरी, स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या संशोधकांनी यावर संशोधन केलं आहे. उच्च सापेक्ष आर्द्रतेत एन 95 मास्कला उष्णता दिल्यामुळं त्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे खालावत नाही. याशिवाय त्या मास्कमध्ये अडकलेले सोर्स कोव 2 चे विषाणू निष्क्रिय होऊ शकतात.

या संशोधन निंबधाचे लेखक आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ स्टीव्हन चू यांनी सांगितलं की, मास्कचा पुनर्वापर करण्याबाबत काही विचार केला असता यावर तोडगा काढणं शक्य आहे. अनेक डॉक्टर आणि नर्सकडे 1 डझनहून अधिक मास्कचा साठा झाला आहे. मास्कचा तुटवडा असल्यानं अनेकांना मास्क पुन्हा वापरावा लागत आहे. या नव्या पद्धतीमुळं एखाद्या छोट्याशा ब्रेकमध्ये मास्कचे निर्जंतुकीकरण करणं शक्य आहे. मास्कचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी 100
टक्के सापेक्ष आर्द्रतेसह 25 ते 95 टक्के सेल्सियस तापमानावर 30 मिनिटे उष्णता देण्यात आल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. एसीएन नॅनो या नियतकालिकेत हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.