मुलांसाठी खास App, आई वडीलांच्या ‘परवानगी’ शिवाय करता येणार नाही ‘स्मार्टफोन’चा वापर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आजकाल आई वडीलांसाठी काय आणि मुलांसाठी काय, स्मार्टफोन ही सहज हाताळण्याची वस्तू झाली आहे. अनेक वेळा सार्वजनिक जीवानात लोक फोनवर जास्त व्यस्त असताना दिसतात. मुलं तर सहज आपल्या आई वडीलांचे मोबाइल वापरताना दिसतात. यामुळे मुलांच्या डोळ्यावर वाईट परिणाम होत आहे. परंतू एक अ‍ॅप असे आहे जे आई वडीलांच्या परवानगी शिवाय मुलांना मोबाइलचा वापर करण्यास परवानगी देत नाही.

RespondASAP नावाचे हे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आई वडील आपल्या मुलांवर नजर ठेवू शकतात. त्यातून आई वडील जाणून घेऊ शकतात की मुलं स्मार्टफोनचा वापर कसा करत आहेत. या अ‍ॅपमध्ये एक फीचर आहे ज्यामुळे मुलं फोनचा वापर करु इच्छित असेल तर त्याआधी आई वडीलांना एक मेसेज पाठवण्यात येईल, यानंतरच स्मार्टफोन अनलॉक होईल. या अ‍ॅपची विशेषता म्हणजे फोन साइलेंट मोडवर असेल तरी देखील या अ‍ॅपवरुन मेसेज आल्यास मेसेजचा आवाज येईल. हा आवाज तोपर्यंत येईल जो पर्यंत मेसेज रिसीव्ह करणार मुलगा त्या मेसेजला रिप्लाय देणार नाही.

याशिवाय आई वडील आपल्या फोनवर पाहू शकतील की त्यांचा मुलं स्मार्टफोनवर काय काय पाहत आहे. याशिवाय विशेष म्हणजे आई वडील कोणत्याही क्षणी मुलांचा फोन लॉक करु शकतात. या अ‍ॅप संंबंधित सांगण्यात येते की अनेकदा मुलं स्मार्टफोनचा वापर करताना हेडफोनचा वापर करतात. त्यामुळे मुलांना अनेकदा आवाज देऊन देखील त्याचे लक्ष नसते. परंतू जर त्यांच्या फोनमध्ये RespondASAP अ‍ॅप असेल तर याला देखील मॉनिटर केले जाऊ शकते. RespondASAP सध्या अ‍ॅण्ड्राइडसाठी आहे. लवकरच हे अ‍ॅप आयओएससाठी सादर करण्यात येईल.

Visit : Policenama.com