मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पडणार मुसळधार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार आहे. सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो मात्र यावर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असून पुढील काही दिवसांत मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार , परतीच्या पावसाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानपासून सुरू होते. पण यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊसही लांबणीवर गेला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. पुढील काही दिवसांत मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या वर्षीचा मान्सून सर्वत्रच मुसळधार बरसत आहे. बुधवारी व गुरुवारी पुण्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. येथील अतिवृष्टीमुळे मृतांचा आकडा 15 झाला आहे.
लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा
तुम्हाला माहिती आहेत का कांद्याचे ‘हे’ ६ आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या
ग्रीन कॉफी’ मुळे बरा होऊ शकतो मधुमेह, ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय
तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय
मेंदूची क्षमता वाढण्यासाठी ‘हे’ आहे रामबाण औषध, स्वयंपाक घरातच उपलब्ध