‘ऋषि कपूर’साठी पत्नी नीतू अन् मुलगा रणबीरनं ठेवली ‘प्रार्थना सभा’ !

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : 30 एप्रिल रोजी ऋषि कपूर हे जग सोडून गेल्यानंतर चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सर्वजण कपूर कुटुंबाचे सांत्वन करत असून ऋषि कपूर यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. आता ऋषि कपूर यांची पत्नी आणि मुलाने त्यांच्यासाठी प्रार्थना सभा ठेवली आहे.

रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही ऋषि कपूरच्या छायाचित्राजवळ बसले आहेत. रणबीर कपूरने पांढरा कुर्ता पायजामा परिधान केला आहे आणि नारंगी पगडी घातली आहे, तर नीतू या पांढर्‍या सूटमध्ये आहेत.

ऋषि कपूर यांच्या अंत्यसंस्कारात कुटुंबीयांसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही स्टार्स सहभागी झाले होते. परंतु लॉकडाऊनमुळे ऋषि कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकली नाही. सध्या रिद्धिमा कपूर देखील मुंबईला पोहोचली आहे. रिद्धिमा आपल्या वडिलांना अखेरचा निरोप तर देऊ शकली नाही. परंतु त्यांच्या प्रार्थना सभेत जरूर हजर झाली आहे.

रिद्धिमा दिल्लीत राहते, त्यामुळे ती मुंबईला वेळेवर येऊ शकली नाही. तथापि, ती आता कुटुंबासमवेत आहे. शनिवारी रात्री रिद्धिमा रोडने प्रवास करत मुंबईला पोहोचली. नीतू कपूरविषयी बोलायचे झाले तर पती ऋषि कपूर यांच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. नीतू यांनी ऋषि कपूरचा फोटो शेअर केला आणि लिहिले की आता त्यांच्या दोघांची कहाणी संपली आहे.

ऋषि कपूर हे 67 वर्षांचे होते आणि दोन वर्षांपासून कर्करोगासारख्या मोठ्या आजाराशी झगडत होते. श्वास घेण्यात अडथळा येऊ लागल्याने 29 एप्रिल रोजी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 30 एप्रिल रोजी सकाळी त्यांचे मुंबईतील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले.