Risk Of Heart Attack | हार्ट अटॅकचा धोका अनेकपट वाढवते इतक्या तासांपेक्षा कमीची झोप, दीर्घकाळ हृदय राहील संकटात, रिसर्चमध्ये भीतीदायक गोष्ट उघड

नवी दिल्ली : Risk Of Heart Attack | झोपेची कमतरता ही अनेक रोगांना थेट निमंत्रण आहे. झोपेच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हृदयावर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक आणि हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचा धोका दीर्घकाळ टिकून राहतो (Risk Of Heart Attack ), असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे (Risk of Heart Attack Due to Lack of Sleep).

अभ्यासात म्हटले आहे की, काही लोकांना जास्त व्यस्ततेमुळे आठवड्यातून ५ दिवस पुरेशी झोप घेता येत नाही, म्हणून ते याची भरपाई करण्यासाठी वीकेंडला खूप झोपतात, परंतु यामुळे रोजच्या कमी झोपेची भरपाई होऊ शकत नाही. पेन स्टेटच्या अलीकडील संशोधनात म्हटले आहे की, दररोज ५ तासांपेक्षा कमी झोपेमुळे दीर्घकाळापर्यंत कार्डियोव्हॅस्क्युलर डिसीजचा धोका अनेक पटींनी वाढतो. (Risk Of Heart Attack)

जर्नल ऑफ सायकोसोमॅटिक मेडिसिनमध्ये प्रकाशित या रिसर्च पेपरमध्ये लेखिका डॉ. अ‍ॅनी मेरी चँग यांनी सांगितले की, आधुनिक काळातील बहुतांश लोक आवश्यक वेळेपेक्षा कमी झोप घेतात. जे लोक आवश्यक वेळेपेक्षा कमी झोप घेतात, त्यांना दीर्घकाळ हृदयाशी संबंधित आजारांचा धोका असतो.

तरुणांमध्ये कमी झोपेचा घातक परिणाम

अभ्यासानुसार, जर कुणी तरुण कमी झोप घेत असेल तर त्याला नंतर हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात २० ते ३५ वयोगटातील काही लोकांचा समावेश केला आणि त्यांची दिनचर्या लक्षात घेतली. या लोकांना ११ दिवसांच्या प्रयोगात समाविष्ट करण्यात आले.

प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांना पहिले ३ दिवस जास्तीत जास्त १० तास झोपण्यास सांगितले. त्यानंतर पुढील ५ दिवस दररोज रात्री ५ तास झोप घेण्यास सांगितले. यानंतर त्यांना पुन्हा १० तासांची झोप घेण्यास सांगण्यात आले. दरम्यान, संशोधकांनी सहभागींचे हार्टरेट आणि ब्लड प्रेशर तपासले. यासोबतच दिवसातून हृदयाची अनेकवेळा आणि अनेक प्रकारे तपासणी करण्यात आली.

वजनावर परिणाम

अभ्यासात असे दिसून आले की, प्रयोगादरम्यान जे लोक वॉक करत होते, त्यांचे ब्लड प्रेशर लो होत होते. दुसरीकडे, अभ्यासात सहभागी लोकांचा झोपेच्या बाबतीत दिवस चांगला जात होता, त्या दिवशी त्यांच्या हृदयाचे ठोके एक बीट प्रति मिनिटपेक्षा जास्त होते. सरासरी बेसलाइन हार्टरेट ६९ बीपीएम (बीट पर मिनिट) होता.

जेव्हा झोप दुस-यांदा चांगली झाली तेव्हा हार्टरेट ७८ बीपीएम झाला. त्याच वेळी,
ब्लड प्रेशरमध्ये थोडीशी वाढ दिसून आली. दुसरीकडे, ज्यांना चांगली झोप लागली त्यांचे ब्लड प्रेशर कमी झाले.
पण जेव्हा एखादी व्यक्ती सुरुवातीला कमी झोप घेते आणि नंतर जास्त झोप घेऊ लागते,
तेव्हा त्याचा रक्तदाबही वाढतो. म्हणजेच, नंतरची पुरेशी झोप आधीच्या झोपेतील घट भरून काढू शकत नाही.

संशोधकांनी सांगितले की झोप ही एक बायलॉजिक प्रोसेस आहे, परंतु ती वर्तणूक देखील आहे.
ते म्हणाले की, झोपेची कमतरता हार्टसंबंधित आजारांचा धोका वाढवतेच,
शिवाय त्यामुळे वजन आणि मेंटल हेल्थवरही परिणाम होतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना