आईच्या जुन्या साडीपासून रितेश देशमुखनं बनवले मुलांसाठी ‘कुर्ते’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दिवाळी हा सण आनंदाचा, उत्सवाचा म्हणून ओळखला जातो. या सणाला काय नवीन आणि वेगळे करता येईल का, याचा प्रत्येक जण विचार करत असतो. असाच प्रयोग यंदाच्या दिवाळीला अभिनेता रितेश देशमुखनेही त्याच्या मुलांसाठी केला आहे. नव्याने कपडे विकत घेण्यापेक्षा रितेशने त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून मुलांसाठी नवीन कुर्ते बनवून घेतले (Riteish-Deshmukhs-and-his-kids-got-new-dress-for-diwali-made-from-mothers-old-saree) आहेत. रितेशने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रितेशच्या या खास पेहराव्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असून, अनेकांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या व्हिडिओत रितेशची आई सुरुवातीला हातात साडी घेऊन दिसते आणि नंतर रितेश व त्याची दोन मुले ही त्याच साडीतून बनवलेल्या कुर्त्यामध्ये दिसून येतात. आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे. दिवाळीच्या शुभेच्छा, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दिवाळीसाठी ही सर्वोत्कृष्ट भेट आहे, असे एकाने म्हटले आहे तर आईची कल्पना आणि जेनेलियाने काढलेला व्हिडिओ या दोन्ही गोष्टी आवडल्याचे दुसऱ्या यूजरने म्हटले आहे.