सावधान ! RO चं पाणी आरोग्यासाठी प्रचंड ‘धोकादायक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी म्हणून RO चे पाणी किंवा शुद्ध केलेल्या पाण्याच्या बाटल्यांमधले पाणी वापरले जाते. RO म्हणजे ‘Reverse osmosis’, पाणी साफ करण्याची अशी प्रक्रिया, ज्यावर लोक डोळे झाकून ठेवून विश्वास ठेवतात. परंतु RO पाणी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

NGT चा इशारा

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (NGT ) पाणी स्वच्छ करण्यासाठी RO तंत्रज्ञान धोकादायक असल्याचे सांगितले आहे. नुकताच एनजीटीने आदेश दिला की या धोकादायक तंत्रज्ञानावर बंदी घालावी. एनजीटीने 20 मे रोजी पर्यावरण मंत्रालयाला आदेश दिला की ज्या भागात एक लिटर पाण्यात TDSचे प्रमाण 500 मिलीग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी असेल. त्या भागात RO च्या वापरावर बंदी घालण्यात यावी. परंतु 20 मेच्या या आदेशावरील पर्यावरण मंत्रालयाने कोणतीही कार्यवाही केली नाही.

TDS म्हणजे काय ?

TDS म्हणजे TOTAL DISSOLVED SOLIDS म्हणजेच सेंद्रिय पदार्थ (जीवाणू, विषाणू आणि धातू जसे की शिसे, कॅडमियम, लोह, मॅग्नेशियम, आर्सेनिक) पाण्यात विसर्जित होतात. या घटकांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. आर्सेनिकमुळेही कॅन्सर होऊ शकतो. त्याला पाण्यापासून दूर करण्यासाठी RO खूप प्रभावी आहे. परंतु RO शरीरासाठी उपयुक्त असलेल्या पाण्यामधून आवश्यक खनिजे देखील काढून टाकते. म्हणूनच एनजीटीने आपल्या निर्णयामध्ये असे म्हटले आहे की RO मुळे पाणी वाया जाते तसेच हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे.

RO चे पाणी धोकादायक का आहे ?

RO तंत्राने साफसफाई करताना पाण्यात असलेले खनिज काढून टाकते आणि शरीरात खनिज नसल्यामुळे थकवा, अशक्तपणा, स्नायू दुखणे आणि हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. याचा अर्थ असा की घरात RO बसवल्याने लोकांना वाटते की ते स्वच्छ पाणी पितात, मात्र प्रत्यक्षात पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, म्हणूनच एनजीटीने त्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

डब्ल्यूएचओ देखील धोकादायक मानला

केवळ NGTच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेनेही RO चे पाणी धोकादायक मानले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जर प्रति लिटर पाण्यात TDS चे प्रमाण 500 मिग्रॅ किंवा त्यापेक्षा कमी असेल तर RO मधून पाणी साफ करण्याची गरज नाही. म्हणजे प्रति लिटर 500 मिलीग्राम TDS असलेले पाणी पिण्यायोग्य असू शकते आणि यामुळे कोणतेही नुकसान होत नाही.

शरीराला महत्त्वाची खनिजे मिळत नाहीत

TDS हे पाण्यामध्ये विरघळलेले घन खनिजे आहेत. TDS पाण्यात जेवढे कमी तेवढे पाणी अधिक स्वच्छ. परंतु याचा अर्थ असा नाही की पाण्यात TDS नसावा. पाण्याचे खनिजे महत्वाची आहेत कारण ते पाणी निरोगी करतात. पण संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की RO तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्यात विरघळलेली खनिजे जवळजवळ नष्ट होतात. यामुळे, शरीरास आवश्यक खनिजे मिळत नाहीत आणि म्हणूनच RO तंत्रज्ञान पाणी धोकादायक बनवते. आजकाल मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक घरात RO पाणी वापरले जात आहे. म्हणजेच स्वच्छ पाणी पिण्याच्या नावाखाली आपण असे पाणी वापरत आहोत ज्यामुळे रोग होऊ शकतात.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like