इंदापुरात भर दिवसा घरफोडी, 2 लाख 54 हजाराचे दागीने चोरट्याकडून लंपास

इंदापुर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरातील माळवाडी नं. 2 रोडलगत असणार्‍या सोनाई नगर, पाटील बंगला वसाहत येथील समर्थ बिल्डिंग मधील 3 र्‍या मजल्यावरील फ्लॅटचे दरवाजाचे भर दिवसा कडी कोयंडा तोडून, कुलूप काढून घरफोडी करत तब्बल दोन लाख 54 हजार 500 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारून सोण्या-चांदीचे दागीने व ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी एक वाजणेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत विठ्ठल निवृत्ती नाईकुडे( वय 57 वर्षे) रा.माळवाडी नं 2, रोडलगत पाटील बंगला वसाहत, समर्थ बिल्डींग, 3 रा मजला. इंदापूर, जि. पूणे. यांनी इंदापूर पोलीसात फिर्याद दीली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की दिं 29 रोजी फिर्यादींचा मुलगा हा आजारी असल्याने त्याला इंदापूर येथिल लाइफ केयर सेंटर येथे अ‍ॅडमिट केले होते. फिर्यादी हे शुक्रवारी सकाळी सात वाजलेपासुन मुलाजवळ दवाखाण्यातच थांबले होते. तर त्यां पत्नी व त्यांचे दुकानात काम करणारा कामगार वृषभ हुलगे रा. लासुर्णे, ता.इंदापूर हे सकाळी 11 वाजणेच्या दरम्यान घराला कडी कुलुप लावून मुलाला भेटण्यासाठी दवाखाण्यात आले होते.

त्यानंतर विठ्ठल नायकुडे हे दुपारी एक वाजता त्यांच्या राहत्या घरी गेले असता त्यांच्या समर्थ बिल्डींग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे घराचे दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून, कुलूप काढून अज्ञात चोरट्यांनी आत घरात प्रवेश केला व घरातील गोदरेज कापाटाचे लाॅकर तोडून कपाटातील सोण्याचे दागीने सोन्याचे गंठण (तीन तोळे), सोन्याची चैन(दोन तोळे), पिळ्याच्या सोन्याच्या सात अंगठ्या (27 ग्रॅम,750 मीली),पुष्कराज अंगठी (एक तोळा),खड्याच्या दोन अंगठ्या (12 ग्रॅम),अर्धा तोळ्याची चैन व त्यात एक ग्रॅमचे बदाम, तीन सोन्याची मंगळसुत्र (13.5 ग्रॅम), कानातील दोन जोड( 5.2 ग्रॅम),चांदीचा लक्ष्मीचा एक शिक्का असे सोने व चांदीचे एकूण 2 लाख 54 हजार 500 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आल्याने याबाबतची फिर्याद विठ्ठल नायकुडे यांनी इंदापूर पोलीसात दीली असुन या घटनेचा तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे करीत आहेत

चालु आठवड्यातील घरफोडी चौथी घटना घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण.

दरम्यान इंदापुर शहर परिसरात मागील दोन महिन्या पूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. याचीच पुनरावृृत्ती चालु आठवड्यात इंदापूरकरांना पुन्हा अणुभवायला मिळत असल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण आहे. तर नायकुडे यांचे घराचे घरफोडीनंतर त्याच दिवशी इंदापूर शहरातील दत्तनगर परीसरात दिवसाढवळ्या तीन ठीकाणी घरफोडीचे प्रकार घडल्याने शहरातील नागरिक सध्या चोरट्यांच्या दहशतीच्या भितीखाली वावरताना दिसुन येत आहेत.

याबाबतची फिर्याद मात्र इंदापूर पोलीसात कोणी दीलेली नाही.तसेच मागील तीन चार दिवसापूर्वी इंदापूरातील संत सावतामाळीनगर भागातील सुवर्णक्रांती मल्टीस्टेट बॅकेची शाखेचे शटर दरवाजे रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी उचकटून चोरी करण्याचा प्रयत्नही झाला होता. तेथे चोट्यांना हाताला काहीच लागले नाही.त्यानंतर नेहरू चौक येथिल दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला परंतु त्याला यश न आल्याने चोरटे रिकाम्या हातानेच परतले. परंतु या अशा वारंवार घडणार्‍या घटनांनी इंदापूर व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visit : Policenama.com