मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar On Gopichand Padalkar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर यांनी ‘लांडग्याचं पिल्लू’ म्हणत टीका केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समज द्यावी, अन्यथा पवारांवर टीका करण्यासाठीच त्यांना आमदारकी दिल्याचं जाहीर करावं, असं ते म्हणाले. (Rohit Pawar On Gopichand Padalkar)
आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याचे विधान केले होते. त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करुन टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घायलाच हवी. (Rohit Pawar On Gopichand Padalkar)
https://x.com/RRPSpeaks/status/1703757838118691260?s=20
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले, अजित पवारांवर पातळी सोडून बोलणाऱ्या गोपीचंद पडळकर यांची तक्रार आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितले.
तर आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा देताना म्हटले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या व घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ
आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन
Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023 |गणेशोत्सवासाठी मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत करता येणार प्रवास;
जाणून घ्या वेळापत्रक
Rahul Narvekar | सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया;
म्हणाले – ‘मी दिरंगाई केलेली नाही…’
Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार,
अजित पवार समर्थक आक्रमक