Rohit Pawar | अजित पवारांचा दावा रोहित पवारांनी फेटाळला, म्हणाले – ”तर संपूर्ण पक्ष भाजपाबरोबर गेला असता”

अमरावती : Rohit Pawar | भाजपाबरोबर (BJP) जाण्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीच सांगितले नाही. अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाबरोबर गेला आहे. त्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा कुणाची होती आणि कशासाठी होती? हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळला आहे. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार यांनी त्यांच्या गटाच्या कर्जत येथील शिबिरात शरद पवारांबाबत मोठे गौप्यस्फोट केले होते. भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची शरद पवारांची इच्छा होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असे स्वत: शरद पवारांनीच सांगितले होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार म्हणाले, त्यांनी कुठले कुठले खुलासे केले, हे मला माहीत नाही. कारण जी भाषणे संविधानाला धरून
आणि विचाराला धरून असतात, तीच भाषणे आम्ही ऐकत असतो. आता ते तिकडे गेल्यामुळे त्यांची भाषणे आम्हाला
पटत नाहीत आणि समजतही नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bhidewada Smarak | ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात

आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी

तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”