‘आता सरकारनं मंदिर उघडणे आणि जीम सुरू करण्यासंबंधीही विचार करावा’, रोहित पवारांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून महाविकास आघाडीचे आभार मानण्यात आले. तसेच आता राज्य सरकारने मंदिर उघडणे आणि जीम सुरू करणे याबाबत सुद्धा लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.

या मागण्यांमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवागी द्यावी, मंदिरे उघडावीत, जीम व अभ्यासिका सुरू कराव्यात, जनावरांचे बाजार सुरू करावेत अशा काही मागण्यांचा समावेश आहे.राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून काही अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या निर्णयाचे स्वागत करत रोहित पवार म्हणाले, अनेक लोकांचा रोजगार अवलंबून असलेल्या हॉटेल उद्योगाला परवानगी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार. असाच निर्णय जीम, अभ्यासिका आणि मंदिरांबाबतही व्हावा, ही विनंती. तसेच लोकांनी मास्क लावून स्वतःची तसेच पर्यायाने दुसऱ्यांची काळजी घ्यावी.

रोहित पवार यांच्याकडून २२ सप्टेंबर रोजी यासंबंधी मागणी करण्यात आली होती. त्यांचा संदर्भसुद्धा देण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हणले होते, कोरोनाबाबतीत सरकार सर्व प्रयत्न करत असताना काहीजण त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी रेस्टॉरंट, जीम, क्लासचालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असे माझे व्यक्तिगत मत आहे.असे सुद्धा रोहित पवार म्हणाले. राज्य सरकारने लवकरच याबाबतीत निर्णय घ्यावा, हि विनंती आणि सरकार यावर लवकर निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आता जेव्हा राज्य सरकारकडून हॉटेल उघडण्यास परवागनी देण्यात आली तेव्हा रोहित पवार यांनी त्यांचे आभार मांडले आणि बाकीच्या मागण्यांची आठवणसुद्धा करून दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like